.jpg)
फाळणीचे धागे : १९४७ ते १९८४ ते २००२
रविंदर कौर
२० सप्टेंबर २०२१
उर्वशी बुटालिया ‘द अदर साइड ऑफ सायलेंस’ (१९९८) या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकात दिल्लीतील १९८४ च्या शीखविरोधी हत्याकांडानंतर त्यांच्यासाठी फाळणी कशी जिवंत झाली याची आठवण करून देतात. शीख हत्याकांडानंतर त्या निर्वासित शिबिरांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करत असताना अनेकदा ‘हे पुन्हा फाळणीसारखेच आहे' असे वृद्ध लोकांना बोलताना त्यांनी ऐकले. त्या लिहितात, "आपल्या आयुष्यात फाळणी सतत कशी जिवंत होती हे मला …